BMTSC EXAM (2016-17) Message to students

Comments and Suggestions.

Friends,

Congratulations for participating in a challenging competition! The results are announced , we take an opportunity to talk to you and give some suggestions and comments.

  1.   The purpose of conducting BMTS exam is to give students challenging problems to solve, which will force them to think and apply their problem solving skills. That is the reason that the exam has descriptive questions and not just MCQs. This way the competition gives an idea of the nature of competitive exams at higher levels.

  2. Grades in this exam should not be compared with that obtained in school exams. School exams are based on defined syllabus and follow a standard pattern. This exam is primarily designed to challenge students' thinking. They need to apply same concepts in creative ways to solve the exam problems. If one decides to give minimum importance to the marks/ grade and enjoys to solve the challenging problems, that is the best approach. All of you have enjoyed solving at least some questions in the exam.

  3. Students who feel they fell short of their own expectations never mind. They should look at this exam as the step towards high level competitive exams that they will be facing in the years to follow.

  4. The BMTSC team actually wants the students to enjoy solving these puzzle-like questions. In fact it will be very interesting to know how the student approaches a problem. So it is suggested that students should do proper rough-work, question-wise. While doing the rough work, the students might as well get new ideas to solve the problems. Also it was observed that students need to read the problems more number of times.

The suggestions and guidance will be useful for you in your future studies and to be successful.

 Wish you all the best for future studies and to enjoy mathematics.

You are welcome to discuss Mathematics and take part in camps and regular teaching sessions of Bhaskaracharya Pratishthana.

BMTSC Team

मार्गदर्शन आणि सूचना

विद्यार्थी मित्र / मैत्रिण,

ही स्पर्धा परीक्षा तुम्ही दिलीत ह्या बद्दल तुमचे सर्वप्रथम अभिनंदन. वेगळी आणि कस बघणारी अशीच ही स्पर्धा होती. आज निकाल जाहीर करताना आम्ही सर्व संयोजक तुमच्याशी बोलून काही सूचना ,मार्गदर्शन देत आहोत.

  1. भास्कराचार्य गणित प्रज्ञा शोध स्पर्धेचा हेतू विद्यार्थ्यांना जरा आव्हानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी देणे आणि त्या योगे परीक्षेत त्याना विचार करायला आणि प्रश्न सोडवण्याच्या क्षमता वापरायला लावणे असा आहे. त्यामुळे केवळ बहु पर्यायी प्रश्न न विचारता, अधिक लिहायला, रीत दाखवायला लागेल असे प्रश्न विचारले. ह्या पद्धती मधून पुढे तुम्ही देणार असलेल्या स्पर्धांची कल्पना तुम्हाला यावी असा प्रयत्न आहे.
  1. ह्या स्पर्धेत मिळालेली श्रेणी आणि तुम्हाला शाळेतील परीक्षा मध्ये मिळणारी श्रेणी यांची तुलना करू नये. शाळेच्या परीक्षा ठराविक अभ्यासक्रमावर आधारित असतात आणि परीक्षेचे स्वरूप, पद्धती निश्चित असते. प्रतिष्ठानची स्पर्धा परीक्षा जे येते त्याची उजळणी करण्यासाठी नसून, विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना देण्यासाठी आहे. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने पद्धती तयार करून गणिते सोडवणे आवश्यक आहे. अशा परीक्षांमध्ये गुण किंवा यश अपयशाला मर्यादित महत्व देऊन, असे प्रश्न सोडवण्याचे आव्हान स्वीकारून आनंद घेणे महत्वाचे. आणि परीक्षेला सामोरे जाण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. असा आनंद तुमच्या पैकी प्रत्येकानेच कमी अधिक प्रमाणात घेतला.
  1. ह्या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नसेल तरीही नाउमेद न होता, त्यांनी परीक्षेचा उद्देश लक्षात घेऊन, पुढे तुम्ही ज्या अधिक अवघड स्पर्धा परीक्षा देणार त्यांच्या तयारीतील एक पायरी म्हणून ह्या परीक्षेकडे बघावे, आणि प्रगती करून घ्यावी.
  1. संयोजकांची इच्छा असे कोडीवजा प्रश्न सोडवण्याची मजा तुम्ही घ्यावीत अशी आहे. त्यां दृष्टीने विद्यार्थी प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवतो हे बघणे महत्वाचे आहे. त्यामुळे अधिक सविस्तर आणि रीत पुरेशी स्पष्ट करून उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे लिहिताना अधिक सुसूत्र विचार होतो आणि उत्तर मिळणे सोपे होते. कच्चे काम, रफ, हे सुद्धा जास्त आणि व्यवस्थित करावे. प्रश्न वारंवार वाचून अर्थ समजून घ्यावा. ह्या पद्धतीने प्रयत्न करताना नवीन कल्पना सुचतात.

पुढील अभ्यासासाठी आणि स्वतः अधिक यशस्वी होण्यासाठी वरच्या सूचना तुम्हाला भविष्यातही उपयोगी ठरतील.भविष्यातील अभ्यासासाठी, गणिताचा अधिक आनंद घेण्यासाठी खूप शुभेच्छा !गणितातील प्रश्न वा अन्य गोष्टीसाठी प्रतिष्ठानशी जरूर संपर्क साधा. येथील सुट्टीतील शिबिरे आणि नेहमीच्या वर्ष भरातील वर्गात जरूर सहभागी व्हा.

संयोजक